भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५९ :
ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे :
कलम : ५९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : (a)(क) (अ) ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे – अपराध घडल्यास.
शिक्षा : अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या निम्म्याइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
अपराध : (b)(ख) (ब) अपराध हा मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
अपराध : (c)(ग) (क) अपराध न घडल्यास.
शिक्षा : अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
लोकसेवक म्हणून ज्या अपराधास प्रतिबंध करणे हे त्याचे कर्तव्य आहे तो अपराध घडणे सोपे जावे या उद्देशाने किंवा त्यामुळे तो सोपा होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना, असा अपराध केला जाण्याचा बेत अस्तित्वात असल्याचे कोणत्याही कृतीने अगर अवैध अकृतीने किंवा इन्क्रीप्शन किंवा माहिती लपविण्याच्या इतर कोणत्याही साधानांचा वापर करून इच्छापूर्वक लपवील किंवा अशा बेतासंबंधी खोटे निवेदन करील त्याला,-
(a) क) (अ) तो अपराध घडला, तर त्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाची सर्वाधिक मुदतीच्या निम्म्या पर्यंत असू शकेल, किंवा अपराधाकरिता उपबंधित केलेल्या अशा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील; अथवा
(b) ख) (ब) अपराध जर मृत्यूच्या किंवा २.(आजीवन कारावासाच्या) शिक्षेस पात्र असेल तर दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या शिक्षा होईल; अथवा
(c) ग) (क) जर अपराध घडला नाही, तर त्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाच्या सर्वाधिक मुदतीच्या १/४ पर्यंत असू शकेल किंवा त्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या अशा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
जबरी चोरी करण्याबद्दलचे जे जे बेत आपणांस माहीत होतील त्या सर्वांची माहिती देण्यास स्वत: विधित: बद्ध असून आणि (ख) ने जबरी चोरी करण्याचा बेत रचला आहे हे माहीत असूनही (क) हा पालीस अधिकारी तो अपराध घडणे सुकर करण्याच्या उद्देशाने तशी माहिती देण्याचे चुकवतो. याबाबतीत (क) ने अवैध अकृतीद्वारे (ख) च्या बेताचे अस्तित्व लपवले आहे, आणि या कलमाच्या उपबंधांनुसार तो शिक्षेस पात्र आहे.