भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५८ :
मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपविणे :
कलम : ५८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : (a)(क) (अ) मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपविणे, जर अपराध घडल्यास.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
अपराध : (b)(ख) (ब) अपराध न घडल्यास.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जो कोणी अपराध करणे सोपे जावे म्हणून इच्छापूर्वक अगर तशी जाणीव असताना आणि असा अपराध मृत्यूची अगर आजीवन कारावासाची शिक्षा असलेला असतो, असा अपराध करण्याचा बेत अस्तित्वात असल्याचे कृतीने अगर अवैध अकृतीने किंवा इन्क्रिप्शन किंवा माहिती लपविण्याचा इतर कोणत्याही साधानांचा वापर करून इच्छापूर्वक लपवील आणि अशा बेतासंबंधी जे खोटे आहे असे स्वत:ला माहीत असताना निवेदन देईल तर त्याला,-
(a) क) (अ) जर प्रत्यक्षात अपराध घडला तर, सात वर्षेंपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाचा कारावास होईल; अथवा
(b) ख) (ब) जर अपराध घडला नाही तर तीन वर्षेंपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल; आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरण :
(ख) या ठिकाणी दरोडा घातला जाणार आहे हे माहीत असताना विरुद्ध दिशेला असलेल्या (ग) या ठिकाणी दरोडा घालण्यात येणार आहे असे (क) दंडाधिकाऱ्याला खोटे कळवतो, आणि त्याद्वारे तो अपराधध सुकर करण्याच्या उद्देशाने दंडाधिकाऱ्याची दिशाभूल करतो. रचलेल्या बेतानुसार (ख) येथे दरोडा घातला जातो. (क) या कलमाखाली शिक्षेस पात्र आहे.