भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५६ :
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण (चिथावणी) :
कलम : ५६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण-अपप्रेरणाच्या परिणामी अपराध न घडल्यास.
शिक्षा : अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
अपराध : अपप्रेरक किंवा अपप्रेरित व्यक्ती ही अपराध घडण्यास प्रतिबंध करणे हे ज्याचे कर्तव्य आहे असा लोकसेवक असल्यास.
शिक्षा : अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या निम्म्याइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जो कोणी कारावासाच्या शिक्षेस पात्र अशा एखाद्या अपराधास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्यास, जर त्या अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून अपराध घडला नसेल आणि अशा अपप्रेरणाबद्दल (चिथावणीबद्दल) शिक्षा देण्याची स्पष्ट तरतूद नसेल, तर मूळ अपराधास उपबंधित केलेल्या सर्वाधिक मुदतीच्या १/४ मुदतीपर्यंत असू शकेल इतकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा त्या अपराधास उपबंधित केलेल्या अशा द्रव्यदंडाची, किंवा अशा दोन्ही शिक्षा होतील; आणि जर अपप्रेरक (चिथावणी देणारा) किंवा अपप्रेरित (चिथावणी दिली गेलेली व्यक्ती) ही लोकसेवक असून असा अपराध घडण्यास प्रतिबंध करणे हे त्याचे कर्तव्य असेल तर, अपप्रेरकास (चिथावणी देणाऱ्यास) त्या अपराधास नमूद केलेली जी सर्वाधिक शिक्षा असेल त्याच्या निम्मी शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (ख) ला खोटा पुरावा देण्यास चिथावणी देतो. याबाबतीत, (ख) ने खोटा पुरावा दिला नाही तरीही, या कलमामध्ये व्याख्या केलेला अपराध (क) ने केलेला आहे, आणि तदनुसार तो शिक्षेस पात्र आहे.
(b) ख) (क) हा पोलीस अधिकारी असून जबरी चोरीला प्रतिबंध करणे हे त्याचे कर्तव्य आहे व तो जबरी चोरी करण्यास अपप्रेरणा देतो. जबरी चोरी घडली नाही तरीही, याबाबतीत (क) त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या कारावासाच्या सर्वाधिक मुदतीच्या निम्म्या कारावासास व द्रव्यदंडास देखील पात्र आहे.
(c) ग) (क) हा पोलीस अधिकारी असून जबरी चोरीला प्रतिबंध करणे हे त्याचे कर्तव्य असताना (ख) जबरी चोरी करण्यास त्याला अपप्रेरणा देतो. जबरी चोरी घडली नाही तरीही या बाबतीत (ख) हा जबरी चोरीच्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या कारावासाच्या सर्वाधिक निम्म्या कारावासास आणि द्रव्यदंडासदेखील पात्र आहे.