भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५४ :
अपराध घडला तेव्हा अपप्रेरक (चिथावणी) देणारा उपस्थित असणे :
कलम : ५४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण – अपराध घडला तेव्हा अपप्रेरक उपस्थित असल्यास.
शिक्षा : केलल्या अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जी व्यक्ती अनुपस्थित (गैरहजर) असती तर अपप्रेरक (चिथावणी देणारी) म्हणून शिक्षापात्र झाली असती ती व्यक्ती अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून ज्याबद्दल शिक्षापात्र होऊ शकते ती कृती किंवा तो अपराध घडतेवेळी ती उपस्थित आहे असे जेव्हा केव्हा होईल तेव्हा, अशी कृती किंवा अपराध तिने केला असल्याचे मानण्यात येईल.