मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११९ :
वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:
१) प्रत्येक मोटार वाहन चालकाने, आज्ञा सूचक वाहतूक चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेल्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेल्या चालनविषयक विनियमांनुसार वाहन चालविले पाहिजे आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने त्याला दिलेल्या निदेशांचे त्याने पालन केले पाहिजे.
२) या कलमामध्ये आज्ञासूचन वाहतूक चिन्ह याचा अर्थ अनुसूचीच्या भाग ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेले वाहतूक चिन्ह किंवा कलम ११६, पोट-कलम (१) नुसार मोटार वाहतूक विनियमित करण्यासाठी बसविण्यात किंवा उभारण्यात आलेले तशाच स्वरूपातील (म्हणजे, कोणतीही निशाणी, शब्द किंवा आकंडे/आकृत्या दर्शविणारे आणि लाल रंगाची पाश्र्वभूमी किंवा किनार असलेली वर्तुळाकृती तबकडी कोणतेही वाहतूक चिन्ह असा होतो.
