मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९२ :
दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे :
जिच्याबाबत या प्रकरणाखाली परवाना देण्यात आला आहे अशा १.(एखाद्वा वाहतूक वाहनातून, ज्यासाठी परमिट किंवा लायसन दिले असेल,) एखाद्या प्रवाशाची वाहतूक करण्याची संविदा झाली असून, वाहनातून प्रवाशाची वाहतूक होत असता किंवा तो वाहनात प्रवेश करत असता किंवा त्यातून उतरत असता, त्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला शारीरिक इजा पोचल्यास एखाद्या व्यक्तीविरुद्ध जी हक्कमागणी उद्भवेल, त्या संबंधातील त्या व्यक्तीचे दायित्व नाकारणे किंवा मर्यादित करणे हे त्या संविदेला अभिप्रेत असेल अथवा असे कोणतेही दायित्व बजावून घेण्यासंबंधी कोणत्याही शर्ती लादणे हे अभिप्रेत असेल तर, तेवढ्या मर्यादेपर्यंत ती संविदा शून्य होईल.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३५ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.