Hma 1955 कलम ११ : शून्य विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
विवाहची शून्यता व घटस्फोट :
कलम ११ :
शून्य विवाह :
या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला कोणताही विवाह, जर त्याद्वारे कलम ५ च्या खंड (एक), (चार) व (पाच) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही एक शर्तीचे व्यतिक्रमण झाले तर, रद्दबातल होईल आणि त्यातील कोणत्याही पक्षाने १.(दुसऱ्या पक्षाविरुद्ध) विनंतीअर्ज सादर केल्यावर शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो तसा झाल्याचे घोषित करता येईल.
———-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ५ द्वारे घातले.

Leave a Reply