Epa act 1986 कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम १२ :
पर्यावरण प्रयोगशाळा :
(१) केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, –
(a) (क) एक किंवा अधिक पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतील.
(b) (ख) या अधिनियमान्वये एखाद्या पर्यावरणी प्रयोगशाळेकडे सोपवावयाची कामे पार पाडण्यासाठी एक किंवा अधिक प्रयोगशाळांना किंवा संस्थांना पर्यावरणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता देता येईल.
(२) केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पुढील गोष्टी विनिर्दिष्ट करणारे नियम करू शकेल :
(a) (क) पर्यावरणी प्रयोगशाळेची कार्ये;
(b) (ख) उक्त प्रयोगशाळेला विश्लेषणासाठी किंवा चाचण्यांसाठी हवेचे, पाण्याचे, मातीचे किंवा इतर पदार्थांचे नमुने सादर करण्याची कार्यपद्धती, प्रयोगशाळेच्या त्यावरील अहवालाचा नमुना आणि अशा अहवालासाठी प्रदेय असलेली फी;
(c) (ग) त्या प्रयोगशाळेला आपली कामे पार पाडणे शक्य होण्यासाठी आवश्यक व समयोचित असतील अशा इतर बाबी.

Leave a Reply