विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ३क :
१.(राष्ट्रकुलांतर्गत देशांतील नागरिकांना व इतर व्यक्तींना विवक्षित प्रकरणी हा अधिनियम लागू होण्यापासून सूट देण्याची शक्ती :
१) केन्द्र शासन आदेश काढून त्याद्वारे असे जाहीर करु शकेल की, या अधिनियमाचे किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशाचे सर्व किंवा काही उपबंध पुढील व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या बाबतीत लागू होणार नाहीत किंवा प्रस्तुत आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशाच परिस्थितीत किंवा असेच अपवाद किंवा बदल करुन किंवा अशाच शर्तीच्या अधीनेतेने लागू होतील :-
(a)क) याप्रमाणे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कोणत्याही राष्ट्रकुलांतर्गत देशाचे नागरिक; किंवा
(b)ख) इतर कोणतीही विशिष्ट विदेशी व्यक्ती किंवा विशिष्ट वर्गाची अथवा वर्णनाची विदेशी व्यक्ती.
२) या कलमाखाली काढलेल्या प्रत्येक आदेशाची एक प्रत, तो आदेश काढल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्यात येईल.)
———-
१. १९५७ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केले (१९-१-१९५७ रोजी व तेव्हापासून).
