कलम ७क : १.(विदेशी व्यक्तीची वर्दळ असणाऱ्या जागांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ७क :
१.(विदेशी व्यक्तीची वर्दळ असणाऱ्या जागांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती :
१) जी वास्तू उपाहारगृह म्हणून किंवा सार्वजनिक राबत्याचे किंवा करमणुकीचे स्थान म्हणून किंवा क्लब म्हणून वापरण्यात येते व जेथे विदेशी व्यक्तींचा राबता असतो अशा कोणत्याही वास्तूच्या मालकास अथवा त्या वास्तूवर ताबाब असणाऱ्या व्यक्तीस पुढील गोष्टी करण्याबाबत विहित प्राधिकरर, विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, निदेश देऊ शकेल :-
(a)क) अशी वास्तू संपूर्णपणे किंवा विशिष्ट कालावधीपुरती बंद ठेवणे, किंवा
(b)ख) विनिर्दिष्ट करण्यात यईल अशास परिस्थितीत अशा वास्तूचा वापर करणे किंवा वापर करु देणे, किंवा
(c)ग) अशा वास्तूमध्ये सर्व विदेशी व्यक्तींना किंवा एखाद्या विशिष्ट विदेशी व्यक्तीला किंवा व्यक्तिवर्गाला प्रवेश नाकारणे.
२) ज्या व्यक्तीला पोटकलम (१) अन्वये कोणताही निदेश देण्यात आलेला असेल ती व्यक्ती, तो निदेश अंमलात असेपर्यंत विहित प्राधिकरणाच्या लेखी पूर्वपरवानगीखेरीज व ज्या अटी घालणे प्राधिकरणास योग्य वाटेल अशा अटीचे अनुसरण केल्याखेरीज, उपरोक्त प्रयोजांपैकी कोणत्याही प्रयोजनासाठी इतर कोणत्याही वास्तूचा वापर करणार नाही किंवा करु देणार नाही.
३) पोटकलम (१) अन्वये कोणताही निदेश देण्यात आलेला असून त्यामुळे जी व्यक्ती नाराज झाली असेल अशा कोणत्याही व्यक्तीस, असा निदेश दिल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत केन्द्र शासनाकडे अपील करता येईल; आणि या बाबतीत केन्द्र शासनाचा निर्णय अंतिम राहील.)
———
१. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम ७ द्वारा समाविष्ट केले.

Leave a Reply