विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम १६ :
इतर कायदे लागू होण्यासाठी आडकाठी नाही :
या अधिनियमातील उपबंध हे विदेशी व्यक्ती नोंदणी अधिनियम १९३९ (१९३९ चा १६), भारतीय पारपत्र (पासपोर्ट) अधिनियम १९२० (१९२० चा ३४) आणि त्या त्या काळी अंमलात असलेली इतर कोणतीही अधिनियमिती यांतील उपबंधांच्या व्यतिरिक्त असतील, त्यास न्यूनकारी असणार नाहीत.
