कलम १२ : प्राधिकार प्रत्यायोजित करण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम १२ :
प्राधिकार प्रत्यायोजित करण्याची शक्ती :
एखादा निदेश, संमती किंवा परवानगी देण्याची किंवा इतर कोणतीही कृती करण्याची शक्ती या अधिनियमान्वये किंवा त्या अधिनियमाखाली काढलेल्या कोणत्याही आदेशान्वये ज्या प्राधिकरणाला प्रदान करण्यात आलेली असेल ते प्राधिकरण, विरुद्ध असा स्पष्ट उपबंध केलेला नसेल तर, आपल्या हाताखालील कोणत्याही दुय्यम प्राधिकरणास आपल्या वतीने अशा शक्तीचा वापर करण्यासाठी, सशर्त किंवा बिनशर्त, लेखी प्राधिकृत करु शकेल, आणि त्यानंतर त्या प्राधिकारपत्रात ज्या काही शर्ती असतील त्यांच्या अधीनतेने, ते दुय्यम प्राधिकरण हे या अधिनियमान्वये किंवा त्याखाली ज्यास अशी शक्ती प्रदान केलेली आहे ते प्राधिकरण असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply