Hma 1955 कलम २१ख : या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा करुन ते निकालात काढण्याविषयी विशेष उपबंध :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१ख : या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा करुन ते निकालात काढण्याविषयी विशेष उपबंध : १) या अधिनियमाखाली विनंतीअर्जाच्या संपरीक्षेचे काम हे, त्या संपरीक्षेसंबंधात न्यायानुकूलतेच्या दृष्टीने व्यवहार्य असेल तेथवर रोजच्या रोज चालू ठेवून पूर्ण करण्यात येईल - मात्र एरव्ही पुढील दिवसापर्यंत तहकूब…