Hsa act 1956 कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ उत्तराधिकारासंबंधी सर्वसाधारण उपबंध : कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान : जर नातेसंबंधाचे स्वरुप अन्य प्रत्येक बाबतीत तेच असेल तर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी सख्ख्या नात्याने संबंधित असलेल्या वारसदारांना सापत्न नात्याने संबंधित असलेल्या वारसदारांपेक्षा अधिमान दिला जाईल.