अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम २० :
अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी) असणे :
या अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करुन, या अधिनियमाचे उपबंध त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात किंवा कोणत्याही रुढीमध्ये किंवा परिपाठामध्ये किंवा अशा कोणत्याही कायद्याच्या आधारे परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखामध्ये तद्विरुद्ध काहीही अंतर्भूत असले तरीही, परिणामक होतील.