अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम १९ :
या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यक्तिंना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे :
या अधिनियमाखालील अपराध केल्यामुळे दोषी असल्याचे आढळून आलेल्या अठरा वर्षावरील वयाच्या कोणत्याही व्यक्तिला, संहितेच्या कलम ३६० चे उपबंध आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) याचे उपबंध लागू होणार नाहीत.