SCST Act 1989 कलम १४-क : अपिले :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम १४-क :
१.(अपिले :
१)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी विशेष न्यायालये किंवा एकमेव (अनन्य) विशेष न्यायालये दिलेला कोणताही निर्णय, शिक्षा किंवा आदेश परंतु अंतरीम आदेश या व्यतिरिक्त असेल याविरुद्ध उच्च न्यायालयाकडे कायद्यान्वये व घटनांवर आधारीत अपील करता येईल.
२)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यातील कलम ३७८ च्या पोटकलम ३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी विशेष न्यायालयाकडे अपील करता येईल.
३)कोणत्याही अधिनियमात त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी या कलमाखालील प्रत्येक अपील निकाल, शिक्षा किंवा आदेश दिल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत करता येईल.
परंतु असे की, नव्वद दिवसांचा कालावधी संपल्यानंतर उच्च न्यायालयाची अशी खात्री झाली असेल की, अर्जदाराला नव्वद दिवसांच्या आत अपील करता आले नाही याबद्दल योग्य ते कारण दाखविता आले नाही तर त्यांना अपील सुनावणीस घेता येईल.
परंतु आणखी असे की, एकशेएेंशी (१८०) दिवसांच्या कालावधी संपल्यानंतर कोणतेही अपील विचारात घेतले जाणार नाही.
४)पोटकलम (१) खाली केलेले प्रत्येक अपील त्याची नोंदणी झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत निकालात काढले पाहिजे.)
———
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ९ द्वारा (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply