अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
प्रकरण ३ :
तडीपारी :
कलम १०:
अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तिंना दूर करणे :
१)संविधानाच्या अनुच्छेद २४४ मध्ये निर्देशित अनुसूचित क्षेत्रे किंवा जनजाती क्षेत्रे यात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रात १.(किंवा कोणतेही क्षेत्र कलम २१ च्या पोटकलम (२) च्या खंड (सात) मधील तरतुदीनुसार) एखादी व्यक्ति या अधिनियमाच्या प्रकरण दोन खालील एखाद्या गुन्हा करावयाची शक्यता आहे याबाबत एखाद्या फिर्यादीवरुन किंवा पोलीस अहवालावरुन विशेष न्यायालयाचे समाधान झाले असेल तर, ते, लेखी आदेशाद्वारे त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा क्षेत्राच्या सीमेपलीकडे, अशा मार्गाने आणि अशा वेळेच्या आत निघून जावे आणि तिला ज्या क्षेत्रातून निघून जाण्यास निर्देशित करण्यात आले असेल तेथे, त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल
अशा २.(तीन वर्षाहून) अधिक नसेल इतक्या कालावधीच्या आत तिने परत येऊ नये, असे निर्देशित करु शकेल.
२)पोटकलम (१) खालील आदेशाबरोबर विशेष न्यायालय त्या पोटकलमान्वये निर्देशित करण्यात आलेल्या व्यक्तिला, असा आदेश ज्या कारणांवरुन देण्यात आला असेल ती कारणे कळवील.
३)पोटकलम (१) खालील आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत, ज्या व्यक्तिविरुद्ध आदेश देण्यात आला असेल तिच्याकडून अथवा तिच्यावतीने अन्य कोणत्याही व्यक्तिकडून अशा आदेशाविरुद्ध अभिवेदन करण्यात आल्यानंतर लेखी अभिलिखित करावयाच्या कारणांसाठी विशेष न्यायालयाला असा आदेश प्रत्याèहत करता येईल किंवा त्यात फेरबदल करता येईल.
———
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ७ द्वारा (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ७ द्वांरा (दोन वर्षाहून) या मजकुराऐवजी (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.