माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रकरण ६ :
संकीर्ण :
कलम २१ :
सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण :
या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही व्यक्तिविरुद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही.