Rti act 2005 कमल ५ : जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कमल ५ :
जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे :
१)प्रत्यके सार्वजनिक प्राधिकरण, हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून शंभर दिवसांच्या आत, या अधिनियमान्वये माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिंना माहिती देण्यासाठी, त्याच्या अखत्यारीतील सर्व प्रशासकीय युनिटांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आवश्यक असतील तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करील.
२)पोटकलम (१) च्या तरतुदींना बाध न येऊ देता, प्रत्यके सार्वजनिक प्राधिकरण, हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून शंभर दिवसांच्या आत, या अधिनियमान्वये माहिती मिळण्यासाठी केलेले अर्ज किंवा अपिले स्वीकारुन, ती तात्काळ केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्यास किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्यास , किंवा कलम १९ च्या पोटकलम (१) अन्वये विनिर्दिष्ट केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अथवा केंद्रीय माहिती आयोगास, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोगास पाठविण्यासाठी, प्रत्यके उप विभागीय स्तरावर किंवा अन्य उप-जिल्हा स्तरावर, एखाद्या अधिकाऱ्यास केंद्रीय सहायक जन माहिती अधिकारी, किंवा यथास्थिति, राज्य सहायक जन माहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करील :
परंतु, माहिती मिळण्याबाबतचा अर्ज किंवा अपील, केंद्रीय सहायक जन माहिती अधिकाऱ्यास , किंवा यथास्थिति, राज्य सहायक जन माहिती अधिकाऱ्यास देण्यास आला असेल त्याबाबतीत, कलम ७ च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या उत्तर देण्याच्या कालावधीची संगणना करताना, त्यात आणखी पाच दिवसांचा कालावधी मिळविण्यात येईल.
३)प्रत्येक केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यकिं्तनी केलेल्या विनंतीवर कार्यवाही करील आणि अशी माहिती मागणाऱ्या व्यकिं्तना वाजवी सहाय्य करील.
४)प्रत्येक केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्यास, किंवा, यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकाऱ्यास, त्याची किंवा तिची कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी त्याला किंवा तिला आवश्यक वाटेल अशा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याचे सहाय्य मागता येईल.
५)पोटकलम (४) अन्वये ज्याचे सहाय्य मागण्यात आले आहे असा कोणताही अधिकारी, त्याचे किंवा तिचे सहाय्य मागणाऱ्या केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्यास, किंवा यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकाऱ्यास, संपूर्ण सहाय्य करील आणि या अधिनियमाच्या तरतुदींच्या कोणत्याही उल्लंघनाच्या प्रयाजनार्थ, असा अन्य अधिकारी, हा, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी किवा राज्य जन माहिती अधिकारी असल्याचे समजण्यात येईल.

Leave a Reply