Pwdva act 2005 कलम ९ : संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ९ :
संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये :
(१) पोलीस अधिकाऱ्याने –
(a)क)(अ) दंडाधिकाऱ्याला या अधिनियमाखालील त्याची कार्ये पार पाडण्यास मदत करणे;
(b)ख)(ब) कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मिळाल्यावर विहित नमुन्यातील आणि विहित रीतीने तयार केलेली कौटुंबिक घटना अहवाल दंडाधिकाऱ्याकडे सादर करणे आणि ज्याच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादांच्या आत कौटुंबिक हिंसाचार घडल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला आणि त्या क्षेत्राच्या सेवा पुरवठादाराला त्याच्या प्रती अग्रेषित करणे;
(c)ग) (क) बाधित व्यक्तीची जर तशी इच्छा असेल तर, अनुतोष देण्याची आणि संरक्षण आदेशाची मागणी करण्यासाठी विहित नमुन्यातील आणि विहित रीतीने दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे;
(d)घ)(ड) बाधित व्यक्तीला, विधी सेवा प्राधिकरणे अधिनियम, १९८७ (१९८७ चा३९) याखालील विधिसाहाय्य पुरविण्यात येते हे सुनिश्चित करणे आणि तक्रार ज्या नमुन्यात करावयाची तो विहित नमुना मोफत उपलब्ध करून देणे;
(e)ङ)(ई) दंडाधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रातील विधिसाहाय्य, किंवा समुपदेशन पुरविणाऱ्या सर्व सेवा पुरविणाऱ्या संस्था, आश्रयगृहे व वैद्यकीय सुविधा यांची यादी ठेवणे;
(f)च)(फ) बाधित व्यक्तीला जर तशी गरज असेल तर, तिच्यासाठी सुरक्षित आश्रयगृह उपलब्ध करून देणे आणि ते आसरागृह जेथे असेल त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या पोलीस ठाण्याला आणि दंडाधिकाऱ्याला, बाधित व्यक्तीला निवासाला पाठवल्याबाबतच्या आपल्या अहवालाची प्रत पाठविणे;
(g)छ)(ग) बाधित व्यक्तीला जर शारीरिक जखमा झालेल्या असतील तर, तिची वैद्यकीय तपासणी करवून घेणे आणि वैद्यकीय अहवालाची प्रत, कथित कौटुंबिक हिंसाचार ज्या क्षेत्रात घडला असेल तेथे अधिकारिता असणाऱ्या पोलीस ठाण्याला आणि त्या दंडाधिकाऱ्याला पाठवणे;
(h)ज)(ह) फैजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) अन्वये विहित करण्यात ओलेल्या कार्यपद्धतीनुसार, कलम २० खालील आर्थिक अनुतोषाच्या आदेशाचे अनुपालन व अंमलबजावणी करण्यात आली आहे, याची खात्री करून घेणे;
(i)झ)(आय) विहित करण्यात येतील अशा इतर कर्तव्यांचे पालन करणे, हे त्याचे कर्तव्य असेल.
(२) संरक्षण अधिकारी, दंडाधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली आणि पर्यवेक्षणाखाली असेल, आणि या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये दंडाधिकाऱ्याने आणि शासनाद्वारे त्याच्यावर सोपविलेल्या कर्तव्यांचे पालन करील.

Leave a Reply