महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ६ :
आश्रयगृहांची कर्तव्ये :
एखाद्या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने एखाद्या संरक्षण अधिकाऱ्याने किंवा एखाद्या सेवा पुरविणाऱ्याने एखाद्या आश्रयगृहाच्या प्रभारी व्यक्तीला पीडित व्यक्तीला आसरा देण्याची विनंती केली तर, आश्रयगृहाची अशी प्रभारी व्यक्ती त्या पीडित व्यक्तीला आश्रयगृहात आसरा देईल.