महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ३५ :
सद्हेतूने केलेल्या कृतीला संरक्षण :
या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेले नियम किंवा आदेश याअन्वये सद्हेतूने केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे झालेल्या किंवा होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही हानीसाठी संरक्षण अधिकाऱ्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई करता येणार नाही.