Pwdva act 2005 कलम ३३ : संरक्षण अधिकाऱ्याने कर्तव्य न बजावल्याबद्दल शास्ती :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ३३ :
संरक्षण अधिकाऱ्याने कर्तव्य न बजावल्याबद्दल शास्ती :
जर कोणताही संरक्षण अधिकारी पुरेसे कारण नसताना, दंडाधिकाऱ्याने संरक्षण आदेशामध्ये निदेश दिलेल्या त्याच्या कर्तव्याचे पालन करण्यास कसूर करील तर, त्याला दोहोंपैकी कोणत्याही वर्णनाच्या एक वर्षापर्यंतच्या मुदतीच्या कारावासाची किंवा वीस हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply