Pwdva act 2005 कलम २८ : कार्यपद्धती :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २८ :
कार्यपद्धती :
(१) या अधिनियमात तरतूद करण्यात आली असेल ते खेरीजकरून कलमे १२, १८, १९, २०, २१, २२ व २३ खालील सर्व कार्यवाही आणि कलम ३१ खालील अपराध, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या तरतुदीद्वारे नियंत्रित होईल.
(२) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट न्यायालयाला कलम १२ किंवा कलम २३ च्या पोटकलम (२) खालील अर्ज निकालात काढण्यासाठी त्याची स्वत:ची कार्यपद्धती घालून देण्यापासून प्रतिबंध करणार नाही.

Leave a Reply