महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २१ :
ताबा आदेश :
त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, संरक्षण आदेशासाठीच्या अर्जाजी किंवा अधिनियमाखालील इतर कोणत्याही साहाय्यासाठीच्या अर्जाची सुनावणी चालू असताना कोणत्याही टप्प्यात कोणत्याही मुलाचा किंवा मुलांचा तात्पुरता ताबा बाधित व्यक्तीकडे किंवा तिच्या वतीने अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे देणारा आदेश दंडाधिकाऱ्याला काढता येईल, आणि आवश्यक असेल तर, उत्तरवादीने अशा मुलाला किंवा मुलांना भेटण्यासाठीची व्यवस्थाही विनिर्दिष्ट करता येईल :
परंतु असे की उत्तरवादीच्या कोणत्याही भेटीमुळे त्या मुलाच्या किंवा मुलांच्या हितसंबंधाला घातक ठरेल असे दंडाधिकाऱ्याचे मत असेल तर, दंडाधिकारी अशा भेटीला परवानगी देण्याचे नाकारू शकेल.