महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १७ :
विभागून राहत असलेल्या घरात राहण्याचा हक्क :
(१) त्या त्या वेळी, अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, कौटुंबिक नातेसंबंध असलेल्या प्रत्येक महिलेला विभागून राहत असलेल्या घरात राहण्याचा हक्क असेल. मग तिला त्या घरात कोणताही हक्क, स्वामित्व किंवा लाभार्थ हितसंबंध असो वा नसो.
(२) कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यवाहीनुसार असेल ते खेरीज करून बाधित व्यक्तीला विभागून राहत असलेल्या घरातून उत्तरवादीकडून हुसकवून लावण्यात किंवा प्रवेशास मनाई करण्यात येणार नाही.