Posh act 2013 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Posh act 2013
कलम ३० :
अडचणी दूर करण्याचा अधिकार :
(१) जर या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उदभवली तर, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे अशी अडचण दूर करण्यासाठी त्याला आवश्यक वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करील :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभापासून दोन वर्षांचा कालावधी संपल्यावर असा आदेश काढता येणार नाही.
(२) या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्यात येईल.

Leave a Reply