Posh act 2013
कलम २७ :
न्यायालयांनी अपराधाची दखल घेणे :
(१) कोणतेही न्यायालय पीडित महिलेने किंवा याबाबतीत अंतर्गत समितीने किंवा स्थानिक समितीने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून असेल त्याखेरीज, या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची दखल घेणार नाही.
(२) महानगर दंडाधिकाऱ्याच्या किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयास कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्यायचौकशी करणार नाही.
(३) या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध, अदखलपात्र असेल.