Posh act 2013 कलम २४ : समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे :

Posh act 2013
कलम २४ :
समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे :
समुचित शासन, वित्तपुरवठ्याच्या व अन्य साधनसंपत्तीच्या उपलब्धतेस अधीन राहून –
(a)क)(अ) कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीविरूद्ध संरक्षणाची तरतूद करणाऱ्या या अधिनियमाच्या तरतुदीबद्दल जनतेस जाणीव करून देण्यासाठी संबंधित माहिती देईल, शिक्षण संसूचना करील व प्रशिक्षण साहित्य विकसित करील आणि जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करील.
(b)ख)(ब) १.(स्थानिक समितीच्या) सदस्यांकरिता दिशानिदेशक व प्रशिक्षण कार्यक्रम तयार करील.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ३ व अनुसूची २ अन्वये स्थानिक तक्रार समिती या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply