POSH Act 2013 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३
(२०१३ चा १४)
(दि. १४ एप्रिल २०१३)
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
दि. २२ एप्रिल २०१३ रोजी राष्ट्रपींची अनुमती मिळाली असून भारताचे राजपत्र, असाधारण भाग दोन विभाग १, दि. २२ एप्रिल २०१३ मध्ये तो प्रसिद्ध केला आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यापासून संरक्षण करण्याकरिता आणि लैंगिक छळवणूकीच्या तक्रारीस प्रतिबंध करण्याकरिता व त्यांचे निवारण करण्याकरिता आणि त्यासंबंधित व तदनुषंगिक बाबींकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, लैंगिक छळवणूकीमुळे, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ खालील महिलेच्या समानतेच्या मूलभूत हक्कांचे आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१ खालील तिच्या जीविताच्या व प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या हक्काचे आणि लैंगिक छळवणूकीपासून मुक्त असलेल्या सुरक्षित वातावरणाच्या हक्कासह कोणताही पेशा करण्याच्या किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याच्या हक्कांचे उल्लंघन होते.
आणि ज्याअर्थी, २५ जून १९९३ राजी भारत सरकारने, महिलांविरूद्धच्या सर्व प्रकारच्या भेदभावाचे निर्मलून करण्याबाबतच्या अभिसंधीसारख्या आंतरराष्ट्रीय अभिसंधी व करार यांद्वारे लैंगिक छळवणूकीपासून संरक्षण आणि प्रतिष्ठेसह कामाचा हक्क हे वैश्विक मान्यताप्राप्त मानवी हक्क असून त्यांचे अनुसमर्थन केलं आहे.
आणि ज्याअर्थी, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणूकीपासून महिलांचे संरक्षण करण्याकरिता वरील अभिसंधी अंमलात आणण्यासाठी तरतुदी करणे इष्ट आहे;
त्याअर्थी, तो भारतीय गणराज्याच्या चौसष्टाव्या वर्षी पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
——————-
(१) या अधिनियमास कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ असे म्हणावे.
(२) तो संपूर्ण भारतास लागू असेल.
(३) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रामध्ये अधिसूचित करील, अशा १.(दिनांकास्न तो अंमलात येईल.
——
१. अधिसूचना क्रमांक एस.ओ. ३६०६(ई) दिनांक ९ डिसेंबर २०१३, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग (२) कलम ३(२) पहा.

Leave a Reply