Posh act 2013 कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा :

Posh act 2013
कलम १७ :
तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा :
जेव्हा या अधिनियमाच्या तरतुदींन्वये तक्रार हाताळण्याची किंवा त्यावर कार्यवाही करण्याची, चौकशी करण्याची किंवा कोणतीही शिफारस करण्याची किंवा कारवाई करण्याची कर्तव्ये सोपविलेली कोणतीही व्यक्ती, कलम १६ च्या तरतुदीचे उल्लंघन करील तेव्हा, ती व्यक्ती, उक्त व्यक्तीस लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार किंवा जेव्हा असे सेवानियम अस्तित्वात नसतील तेव्हा, विहित करण्यात येईल अशा रीतीने शास्तीसाठी पात्र असेल.

Leave a Reply