Posh act 2013
कलम १६ :
तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास किंवा कळविण्यास मनाई :
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, कलम ९ अन्वये केलेल्या तक्रारीचा मजकूर, पीडित महिलेची, उत्तरवादीची व साक्षीदारांची ओळख व पत्ते, समझोता व चौकशी कार्यवाही, अंतर्गत समितीच्या, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीच्या शिफारशी आणि या अधिनियमान्वये मालकाने किंवा जिल्हा अधिकाऱ्याने केलेली कारवाई, कोणत्याही रीतीने प्रसिद्ध करण्यात येणार नाही, किंवा जनतेला वृत्तपत्रांना व माध्यमांना कळविण्यात येणार नाही किंवा माहीत करण्यात येणार नाही :
परंतु पीडित महिलेचे व साक्षीदारांचे नाव, पत्ते ओळख किंवा तिची ओळख पटण्यास भाग पाडील असा इतर कोणताही तपशील उघड न करता, या अधिनियमान्वये लैंगिक छळवणुकीची बळी पडलेल्या कोणत्याही व्यक्तीस न्याय मिळाल्यासंबंधातील माहिती प्रसारित करता येऊ शकेल.