Posh act 2013
कलम १५ :
नुकसानभरपाई निश्चित करणे :
कलम १३ च्या पोटकलम (३) च्या खंड (दोन) अन्वये पीडित महिलेस प्रदान करावयाची रक्कम निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, अंतर्गत समितीने, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीने पुढील गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे :
(a)क)(अ) पीडित महिलेस झालेल्या मानसिक वेदना, यातना, क्लेष आणि भावनिक दु:ख;
(b)ख)(ब) लैंगिक छळवणुकीच्या घटनेमुळे नोकरीच्या संधीचे झालेले नुकसान;
(c)ग) (क) शारीरिक व मानसशास्त्रीय उपचारासाठी पीडित व्यक्तीने केलेला वैद्यकीय खर्च;
(d)घ) (ड) उत्तरवादीचे उत्पन्न व आर्थिक स्थिती;
(e)ङ)(इ) एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये असे प्रदान करण्याची संभाव्यता.