Posh act 2013
प्रकरण ५ :
तक्रारीची चौकशी :
कलम १२ :
चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई :
(१) चौकशी प्रलंबित असताना पीडित महिलेने केलेल्या लेखी विनंतीवरून अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती मालकाला –
(a)क)(अ) पीडित महिलेची किंवा प्रतिवादीची अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणी बदली करण्याची; किंवा
(b)ख)(ब) तीन महिन्यांच्या कालावदीपर्यंत पीडित महिलेस रजा देण्याची; किंवा
(c)ग) (क) विहित करण्यात येईल असा अन्य दिलासा पीडित महिलेस देण्याची, शिफारस करेल.
(२) या कलमान्वये, पीडित महिलेस दिलेल्या रजा, ती अन्यथा हक्कदार असलेल्या रजेशिवाय असेल.
(३) पोटकलम (१) खालील अंतर्गत समितीच्या, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीच्या शिफारशीवरून, मालक पोटकलम (१) अन्वये केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करील आणि अशा समितीचा अहवाल, अंतर्गत समितीस, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीस सादर करील.