लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
ब – लिंगप्रवेश अंतभूर्त असलेला गंभीर स्वरुपाचा लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा :
कलम ५ :
लिंगप्रवेश अंतभूर्त असलेला गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला :
अ)जो कोणी, पोलीस अधिकारी, बालकावर
१)त्याची नियुक्ती केलेल्या ठाण्याच्या हद्दीत किंवा जागेत किंवा
२)कोणत्याही स्टेशन हाऊसच्या जागेत मग ते त्याची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्यात स्थित असो किंवा नसो किंवा
३)त्याचे कर्तव्य करीत असताना किंवा अन्यथा किंवा
४)जेथे तो पोलीस अधिकारी म्हणून माहीत असेल किंवा ओळखला जात असेल तेथे लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला
ब) जो कोणी, सशस्त्र दलाचा किंवा सुरक्षा दलाचा सदस्य, बालकावर
एक) ज्या क्षेत्रात त्या व्यक्तीला तैनात केले असेल त्या क्षेत्राच्या हद्दीत किंवा
दोन ) दलाच्या किंवा शस्त्र दलाच्या अधिपत्याखालील कोणत्याही क्षेत्रात किंवा
तीन ) त्याचे कर्तव्य करीत असताना किंवा अन्यथा किंवा
चार) जेथे उक्त व्यक्ती ही सुरक्षा किंवा सशस्त्र दलाचा सदस्य म्हणून माहीत असेल किंवा ओळखली जात असेल तेथे,
लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
क) जो कोणी, लोकसेवक बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
ड) जो कोणी त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन केलेल्या तुरूंग, सुधारगृह, संरक्षणगृह, निरीक्षणगृह किंवा ताब्यात ठेवण्याचे किंवा देखभाल किंवा संरक्षण देण्याचे कोणतेही ठिकाण यामधील व्यवस्थापनवर्ग किंवा कर्मचारीवर्ग हा असा तुरूंग, सुधारगृह, संरक्षणगृह, निरीक्षणगृह किंवा ताब्यात ठेवण्याचे किंवा देखभाल किंवा संरक्षण करण्याचे कोणतेही ठिकाण येथे सहवासी असलेल्या बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
ई) जो कोणी, रूग्णालयाचा मग ते शासकीय असो किंवा खासगी असो व्यवस्थापनवर्ग किंवा कर्मचारीवर्ग त्या रूग्णालयात बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
फ) शैक्षणिक संस्थेच्या किंवा धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनवर्गातील किंवा कर्मचारीवर्गातील जो कोणी त्या संस्थेतील बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक
हमला करील किंवा
ग) जो कोणी बालकावर सामूहिकपणे लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील
स्पष्टीकरण : जेव्हा एखाद्या गटातील एका किंवा अधिक व्यक्तींकडून त्यांच्या सामाईक हेतूच्या पुरस्मरणार्थ एखादे बालक लैंगिक हमल्यास बळी पडले असेल तेव्हा या खंडाच्या अर्थातर्गत अशा व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्तीने लिंगप्रवश अंतर्भूत असलेला सामूहिक लैंगिक हमला केला असल्याचे मानण्यात येईल आणि अशी प्रत्येक व्यक्ती ही, जणू काही ती कृती तिने एकट्याने केली होती असे समजून त्या कृतीसाठी जबाबदार असेल किंवा
ह) जो कोणी प्राणघातक हत्यारे, आग, तापलेले पदार्थ किंवा क्षारक पदार्थ यांचा वापर करून बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला किंवा
आय) जो कोणी, बालकाच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरेल असा किंवा शरीराला हानी व इजा पोहोचविण्यास किंवा लैंगिक अवयवाला इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठरेल असा लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
जे) जो कोणी, बालकावर
एक) मानसिक स्वास्थ अधिनियम, १९८७ (१९८७ चा १४) याच्या कलम २ च्या खंड (एल) अन्वये व्याख्या केल्याप्रमाणे, बालकाला शारीरिकदृष्ट्या असमर्थ करणारा किंवा बालकाला मनोरूग्ण बनविण्यास कारणीभूत ठरेल असा किंवा नियमित कामे पार पाडण्यास बालक तात्पुरते किंवा कायमस्वरूपी असमर्थ ठेरल अशा कोणत्याही प्रकारच्या दुर्बलतेस कारणीभूत ठेरल असा;१.(***)
दोन) बालक स्त्री असेल तर, लैंगिक हमल्यामुळे बालिका गर्भवती राहील असा;
तीन ) बालकाला एचआयव्ही किंवा इतर कोणत्याही जीवघेण्या आजाराची किंवा संसर्गाची बाधा होऊन, ते नियमित कामे पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ ठरल्याने किंवा मनोरूग्ण झाल्याने बालकास एकतर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी हानी पोहोचेल असा; १.(***)
२.(चार) बालकाचा मृत्यु घडून आला 😉
लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील ; किंवा
के) जो कोणी बालकाच्या मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेचा फायदा घेऊन त्या बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
एल) जो कोणी, बालकावर एकापेक्षा अधिक वेळा किंवा पुन्हा पुन्हा लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
एम) जो कोणी, बारा वर्षांखालील बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
एन) जो कोणी, बालकाचा रक्ताचा किंवा दत्तक घेतलेला किंवा विवाहावस्थेतील नातेसंबंध असणारा किंवा जोपासना करणारा किंवा बालकाच्या पालकासोबत नातेसंबंध असणारा किंवा बालकासोबत एकाच किंवा सामाईक घराघरात राहणारा नातेवाईक बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
ओ) जो कोणी बालकाला सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही संस्थेच्या किंवा व्यवस्थापनातील किंवा कर्मचारी वर्गातील बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
पी) बालकाचा विश्वास असणारा किंवा प्राधिकार जो कोणी संस्थेत, किंवा बालकाच्या घरी किंवा अन्य कोणत्याही जागी बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
क्यू) जो कोणी, बालक गरोदर आहे हे माहीत असूनही बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
आर) जो कोणी बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील आणि बालकाचा खून करण्याचा प्रयत्न करील किंवा
एस) जो कोणी ३.(जातीय किंवा पंथीय हिंसाचार किंवा नैसर्गिक विपत्ती किंवा यासारखी कोणतीही परिस्थिती निर्माण करीत असताना) बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
टी) ज्याला या अधिनियमाखालील केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही लैंगिक अपराधाबद्दल यापूर्वी दोषी ठरवलेले असेल असा जो कोणी बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील किंवा
यू) जो कोणी बालकावर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील आणि बालकाल नग्न करील त्याला लोकांमधून नग्नपणे फिरवील त्यास लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला म्हटले जाईल.
———
१. २०१९ चा अधिनियम २५ कलम ४ अन्वये किंवा हे शब्द वगळण्यात आला.
२. सन २०१९ चा २५ कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१९ चा २५ चा कलम ४ अन्वये जातीय किंवा पंथीय हिंसाचार या शब्दांऐवजी सामविष्ट करण्यात आले.