Pocso act 2012 कलम ४ : लिंग प्रवेश असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४ :
लिंग प्रवेश असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :
१.(१)जो कोणी, लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील तो २.(दहा वर्षांपेक्षा) कमी नसेल, पण आजीव कारावासापर्यंत असू शकेल इतकया मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
३.(२) जो कोणी, सोळा वर्षां पेक्षा कमी वय असलेल्या एखाद्या बालका वर लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील, तो वीस वर्षांपेक्षा कमी नसेल, पण आजीव कारावास, याचा अर्थ त्या व्यक्तीचा शेष नैसर्गिक जिवनकालचा कारावासपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
३) पोट-कलम (१) नुसार लादलेला दंड न्याय्य आणि वाजवी असेल आणि पीडिताला वैद्यकीय खर्च आणि अशा पीडिताचे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी दिले जाईल.)
———–
१. कलम ४ ला ४(१) प्रमाणे २०१९ चा कलम ३ अन्वये पुन:अंकित केला गेला. (१६-०८-२०१९ रोजी व तेव्हापासून);
२. सन २०१९ चा २५ कलम ३ अन्वये सात वर्षोंपेक्षा या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१९चा २५ कलम ३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply