लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४५ :
नियम करण्याचा अधिकार :
१) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासठी नियम करता येतील.
२) विशेषकरून व पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमात पुढीलपैकी सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल.
१.(अ) कलम १५ च्या पोटकलम १ अन्वये एखाद्या बालकाला अंतर्भूत करणारी कोणत्याही स्वरुपातील संभोगवर्णनपर साहित्य मिटविणे किंवा नष्ट करने किंवा विहित अधिकाऱ्याला रिपोर्ट करण्याची पद्धती;
अअ) कलम १५ च्या पोटकलम १ अन्वये एखाद्या बालकाला अंतर्भूत करणारी कोणत्याही स्वरुपातील संभोगवर्णनपर साहित्य बद्दल रिपोर्ट करण्याची पद्धती;)
२.(अब)) कलम १९चे पोट-कलम ४), कलम २६ ची पोटकलमे २) व ३) आणि कलम ३८ याअन्वये अनुवादक किंवा दुभाषी विशेष शिक्षणतज्ज्ञ किंवा बालकाशी संवाद साधण्याच्या रीतीचा परिचय असलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांची अर्हता व अनुभव आणि त्यांना देय असलेली फी;
ब) कलम १९ च्या पोट-कलम ५) अन्वये बालकाची देखभाल व संरक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचार;
क) कलम ३३ च्या पोट-कलम ८) अन्वये नुकासभरपाईचे प्रदान;
ड) कलम ४४ च्या पोट-कलम १) अन्वये अधिनियमाच्या तरतुदींचे नियतकालिक संनियंत्रण करण्याची रीत.
३) या कलमान्वये केलेले प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेचे अधिवेशन चालू असताना एकाच अधिवेशनात अथवा लागोपाठच्या दोन किंवा त्याहून अधिक अधिवेशनात मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता संसदेच्या प्रत्येक सभागृहा
सामोर मांडण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात तो उपरोक्तपणे मांडण्यात येईल ते अधिवेशन किंवा त्याच्या लागोपाठचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी जर त्या नियमात कोणतेही
फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहांचे एकमत होईल किंवा असा नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत होईल तर, असा नियम त्यानंतर अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अमलात येईल किंवा यथास्थिती मुळीच अमलात येणार नाही तथापि, अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा विलोपनामुळे त्या नियमान्वये यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाधा येणार नाही.
———–
१. २०१९ चा २५ की कलम ११ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा २५ की कलम ११ अन्वये खंड (क) ला खंड (कख) म्हणून पुन: अक्षरांकित करण्यात आले.