लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४३ :
अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती :
केंद्र सरकार व प्रत्येक राज्य शासन हे –
अ) या अधिनियमाच्या तरतुदींविषयी सर्वसामान्य जनता, बालके तसेच त्यांचे आई-वडील व पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नियमित कालांतराने दूरदर्शने, रेडिओ व छापील प्रसारमाध्यमे यांसहित प्रसारमाध्यमांद्वारे या अधिनियमाच्या तरतुदींना व्यापक प्रदिद्धी देण्यात येत आहे.
ब) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंबंधातील बाबींवर केंद्र सरकार व राज्य शासने यांचे अधिकारी आणि इतर संबंधित व्यक्ती (पोलीस अधिकाऱ्यासंह) यांना नियतकालिक प्रशिक्षण देण्यता येत आहे.
याची सुनिश्चिती करण्यासाठी सर्व उपाययोजना करील.