Pocso act 2012 कलम ४२ : पर्यायी शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४२ :
१.(पर्यायी शिक्षा :
जेव्हा एखादी कृती किंवा अकृती ही या अधिनियमान्वये आणि तसेच भारतीय दंडसंहितेची कलमे १६६ अ, ३५४अ, ३५४ब, ३५४क, ३५४ड, ३७०, ३७०अ, ३७५, ३७६, २.(कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब,कलम ३७६ क, कलम ३७६ ड, कलम ३७६ डअ, कलम ३७६ डब), ३.(३७६ई,कलम ५०९ किंवा माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६७ब याअन्वये )शिक्षापात्र अपराध असेल तर, त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अशा अपराधासाठी दोषी असल्याचे आढळून आलेला अपराधी, या अधिनियमात तो ज्या शिक्षेस पात्र असेल किंवा भारतीय दंडसंहितेअन्वये ज्या शिक्षेची तरतूद असेल त्यापैकी ज्या शिक्षेची डिग्री मोठी असेल अशा शिक्षेस पात्र असेल.
——-
१. सन २०१३ चा फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम याच्या कलम २९ अन्वये मूळ कलम ४२ ऐवजी घातला.
२.फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, २०१८ (क्र.२२ सन २०१८) कलम २५ द्वारे सुधारित.(भारताचे राजपत्र, असाधारण, भाग-२, खंड १, दिनांक ११-८-२०१८ रोजी इंग्रजीत प्रकाशित.
३. २०१९ चा २५ अन्वये ३७६ई किंवा ५०९ या शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले (१६-०८-२०१९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply