लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४० :
विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता, (१९७३ (१९७४ चा २) याच्या कलम ३०१ च्या तरतुदींस अधीन राहून, बालकाचे कुटुंब किंवा पालकाना या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी, साहाय्य घेण्याचा हक्क असेल :
परंतु असे की, जर बालकाचे कुटुंब किंवा पालकांना विधि समुपदेशी घेणे परवडत नसेल तर विधिसेवा प्राधिकरण त्यांना वकील देईल.