लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३७ :
न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :
विशेष न्यायालय कक्षांतर्गत आणि बालकाच्या आईवविडलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत प्रकरणांची न्यायचौकशी करील:
परंतु असे की, जेव्हा विशेष न्यायालयाचे असे मत होईल की, न्यायालयापेक्षा इतर ठिकाणी बालकाची तपासणी करणे गरजेचे आहे तेव्हा ते फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या कलम २८४च्या तरतुदींनुसार आयोगपत्र काढण्याची कार्यवाही करील.