Pocso act 2012 कलम ३० : सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३० :
सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक :
१) या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाबद्दलच्या कोणत्याही खटल्यामध्ये आरोपीची सदोष मानसिक स्थिती असणे आवश्यक असेल तेथे, विशेष न्यायालय हे अशी मानसिक स्थिती अस्तित्वार असल्याचे गृहीत धरील; परंतु त्या खटल्यातील अपराध म्हणून दोषारोप केलेल्या कृतीच्या संबंधात त्याची अशी मानसिक स्थिती नव्हती ही वस्तुस्थिती सिद्ध करणे हा आरोपीसाठी एक बचाव असेल.
२) या कलमाच्या प्रयोजनार्थ, एखादी स्थिती वाजवी संशयाच्या पलीकडे अस्तित्वात आहे असा विश्वास असेल विशेष न्यायालयाचा तेव्हाच उक्त वस्तुस्थिती सिद्ध झाल्याचे म्हणण्यात येईल त्या स्थितीचे अस्तित्त्व केवळ शक्यतेच्या प्राबल्यामुळे प्रस्थापित केले असेल तेव्हा ते सिद्ध झाल्याचे मानण्यात येणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमामध्ये, सदोष मानसिक स्थिती यामध्ये वस्तुस्थितीबद्दलचा उद्देश, हेतू, ज्ञान याचा आणि वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे किंवा वस्तुस्थिती मानण्यास कारण असणे यांचा समावेश होतो.

Leave a Reply