लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २९ :
विवक्षित अपराधांविषयीचे गृहीतक :
जेथे एखाद्या व्यक्तीवर, या अधिनियमाची कलमे ३,५,७ व कलम ९ यांखालील अपराध करण्याबद्दल किंवा अपराध करण्यास अपप्रेरणा देण्याबद्दल किंवा अपराधाचा प्रयत्न करण्याबद्दल खटला भरला असेल तेथे अशा व्यक्तीने अपराध केला असल्याचे किंवा अपराध केला असल्याचे किंवा अपराध करण्यास अपप्रेरणा दिली असल्याचे किंवा अपराध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे विशेष न्यायालय हे गृहीत धरील.