लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २६ :
नोंदवावयाच्या जबाबासंबंधातील अतिरिक्त तरतुदी :
१) दंडाधिकारी किंवा यथास्थिती पोलीस अधिकारी बालक बोलले असेल त्याप्रमाणे त्याचा जबाब बालकाच्या आईवडिलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा इतर कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत नोंदवील.
२) दंडाधिकारी किंवा यथास्थिथी पोलीस अधिकारी यांना बालकाचा जबाब नोंदवून घेतेवेळे जेथे जेथे आवश्यकता असेल तेथेतेथे विहित करण्यात येईल अशी अर्हता, अनुभव असलेल्या अनुवादकाचे किंवा दुभाषीचे विहित करण्यात येईल अशी फी प्रदान करून सहाय्य घेता येईल.
३) मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या बालकाच्या बाबतीत, दंडाधिकारी किंवा यथास्थिति, पोलीस अधिकारी त्या बालकाची जबानी नोंदवण्यासाठी विशेष शिक्षकाचे किंवा त्या मुलाशी संवाद साधण्याशी परिचित असलेल्या व्यक्तीचे किंवा विहित करण्यात आलेल्या अर्हता आणि अनुभव असलेल्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे विहित करण्यात आली असेल अशा फीचे प्रदान करून, सहाय्य मागू शकेल.
४) दंडाधिकारी किंवा यथास्थिती पोलीस अधिकारी, जेथेजेथे शक्य असेल तेथेतेथे बालकाचा जबाब दुश्य व श्राव्य इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे नोंदविण्यात येईल याची सुनिश्चित करील.