लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २० :
प्रसारमाध्यमे, स्टुडिओ व छायाचित्रण सुविधा देणारी केंद्रे यांच्यावर प्रकरणांसंबंधातील माहिती कळविण्याचे आबंधन :
प्रसारमाध्यमे किंवा उपहारगृह किंवा निवासगृह किंवा रूग्णालय किंवा क्लब किंवा स्टुडिओ किंवा कोणत्याही छायाचित्रण सुविधा केंद्रे यांमधील नोकरीस असलेल्या व्यक्तींची संख्या लक्षात न घेता तेथील कोणताही कर्मचारी वर्ग ज्यात बालकाचे लैंगिक शोषण (बालक किंवा बालकांचे संभोगवर्णन असलेले त्यांच्या लैंगिकतेसंबंधीचे किंवा त्यांचे अश्लील प्रतिरूपण केलेले ) कोणत्याही माध्यमाचा वापर करून केले जाऊ शकेल असे कोणतेही साहित्य किंवा वस्तू आढळून आल्यावर त्याबाबतची अशी माहिती बालकांसंबंधातील विशेष पोलीस पथकाला किंवा यथास्थिती स्थानिक पोलिसांना पुरवील.