लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम १८ :
अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा :
जो कोणी या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा असा अपराध घडवून आणील आणि अशा प्रयत्नामध्ये अपराध करण्याच्या संबंधातील कोणतीही कृती करील तो त्या अपराधासाठी तरतूद केलेल्या आजीवन कारावासाच्या एक द्वितीयांशापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या किंवा त्या अपराधासाठी तरतूद केलेल्या सर्वाधिक मुदतीच्या कारावासाच्या एक द्वितीयांशापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.