Pocso act 2012 कलम १४ : संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याबद्दल शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम १४ :
१.(संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याबद्दल शिक्षा :
१) जो कोणी, संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा किंवा बालकांचा वापर करील तो पाच वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र असेल आणि दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या अपराधसिद्धीबद्दल सात वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रव्यदंडाच्याही शिक्षेस पात्र असेल.
२) जो कोणी पोटकलम (१) अन्वये संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा किंवा बालकांचा वापर करुन, संभोगवर्णपर कृतीमध्ये सहभागी होऊन, कलम ३ किंवा कलम ५ किंवा कलम ७ किंवा कलम ९ मध्ये निर्देश केलेला अपराध करील, तो उक्त अपराधांकरिता पोटकलम (१) मध्ये उपबंधित दंडा अतिरिक्त क्रमश: कलम ४, कलम ६ आणि कलम १० च्या अधीन शिक्षेस पात्र असेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम २५ की कलम ७ अन्वये कलम १४ च्या ऐवजी समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply