Pocso act 2012 कलम १३ : संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण ३ :
कोणत्याही प्रकारच्या संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर आणि त्यासाठी शिक्षा :
कलम १३ :
संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर :
जो कोणी प्रसारमाध्यमांच्या कोणत्याही प्रकारामध्ये (दूरदर्शन वाहिन्या किंवा इंटरनेट किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे किंवा मुद्रितमाध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या कार्यक्रमासह किंवा जाहिरातीसह मग असा कार्यक्रम किंवा अशी जाहिरात ही वैयक्तिक वापर करण्याच्या किंवा वितरण करण्याच्या हेतूने केलेली असो किंवा नसो) लैंगिक समाधानाच्या प्रयोजनार्थ ज्यामध्ये-
अ) बालकाच्या लैंगिक अवयवांचे प्रदर्शन;
ब) खऱ्या किंवा प्रतिकृती असलेल्या लैंगिक कृतींमध्ये (लिंगप्रवेशासह किंवा लिंगप्रवेशाशिवाय) गुंतविलेल्या बालकाचा वापर,
क) बालकाचे असभ्य किंवा अश्लील प्रदर्शन
यांचा समावेश होत असेल अशा गोष्टींकरिता बालकाचा वापर करीत असेल तो संभोग वर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याच्या अपराधाबद्दल दोषी असेल.
स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनार्थ, बालकाचा वापर या शब्दप्रयोगामध्ये, संभोगवर्णनपर साहित्य तयार करणे, त्याची निर्मिती करणे, ते देऊ करणे, ते प्रसारित करणे, प्रसिद्ध करणे, त्याची सुविधा पुरविणे व त्याचे वितरण करणे यांसाठी मुद्रण, इलेक्ट्रॉनिक, संगणक यांसारख्या कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही तंत्रज्ञानाद्वारे बालकाला गोवणे याचा समावेश होतो.

Leave a Reply