लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम १० :
गंभीर स्वरूपाच्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला करील त्याला पाच वर्षांपेक्षा कमी नसेल, पण सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल.